जयघोष प्रभु रामचंद्राचा..!

Edited by: विनायक गावस
Published on: January 21, 2024 05:53 AM
views 216  views

सावंतवाडी : अयोध्यानगरीत हिंदूंचं दैवत असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांची श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोमवारी केली जाणार आहे. ७०० वर्षांच्या हिंदूंच्या लढ्या व कारसेवक, रामसेवकांच्या बलिदानानंतर आलेल्या या क्षणानिमित्त देशभरात उत्साहाच वातावरण आहे. सावंतवाडी शहरात देखील या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी भव्य बाईक रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. 'जय श्री रामाच्या' जयघोषात रामराज्य असणार हे शहर राममय झालं होत. महिलांसह आबालवृद्ध रामभक्त या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी साकारण्यात आलेले प्रभू श्री रामाचे देखावे खास आकर्षण ठरले. 

अयोध्यानगरीत होणाऱ्या प्रतिष्ठापना सोहळ्याच औचित्य साधून सावंतवाडी शहरात प्रभू श्री राम भक्त व श्रीराम जन्मभूमी उत्सव समिती सावंतवाडीच्यावतीने शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होत. या रँलीला संस्थानकालीन राजवाडा येथून प्रारंभ झाला. संपूर्ण शहरात ही रॅली काढण्यात आली. यात प्रभू रामचंद्राचे साकारलेले देखावे आकर्षण ठरले. भगवे झेंडे, भगवे टोप्या धारण करून बाईक रॅलीत सहभागी झालेल्या राम भक्तांच्या उत्साहामुळे व जय श्री रामच्या जयघोषामुळे सावंतवाडी राममय झाली होती.

याप्रसंगी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, माजी आमदार राजन तेली, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, श्रीराम सावंत, अमेय तेंडोलकर, देव्या सुर्याजी, प्रतिक बांदेकर, विनायक रांगणेकर, किशोर चिटणीस, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, दिपाली भालेकर, भारती मोरे, मंजिरी धोपेश्वरकर, अँड. अश्विनी लेले, संजू शिरोडकर, अजय गोंदावळे, मनोज नाईक, आनंद नेवगी, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, संतोष गांवस, मुकुंद वझे, सुधाकर राणे, संदीप निवळे, परिक्षीत मांजरेकर, विनोद सावंत, विराग मडकईकर, बाळा म्हापसेकर, मेहर पडते, प्रथमेश प्रभू, जोसेफ आल्मेडा, देवेश पडते, वैभव दळवी, गौरव दळवी आदींसह श्रीरामभक्त मोठ्या संख्येने रँली मध्ये सहभागी झाले होते.