फळ पीक विम्याची थांबलेली रक्कम मंजूर : प्रभाकर सावंत

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 21, 2023 19:47 PM
views 120  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ५८ हवामान केंद्रे आहेत. त्यातील १८ केंद्रांवर वातावरणाचे रीडिंग होत नव्हते. त्यामुळे फळ पीक विम्याची या केंद्रांवरील रक्कम अडकली होती. परंतु भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत आणि रिलायन्स इन्श्युरंस कंपनीचे राष्ट्रीय प्रमुख थॉमस आणि महाराष्ट्र प्रमुख पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही रक्कम मिळवून घेतली आहे. त्यामुळे आता या १८ केंद्रांवरील विमा रक्कम वाटप सुरू झाले आहे. जिल्ह्यातील १७ हजार ५५६ हेक्टर क्षेत्रासाठी ६७ कोटी रुपये ३८ हजार ३७३ शेतकऱ्यांना ही रक्कम मंजूर झाली आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.

       जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, कोकण विभाग संघटक डॉ भाई बांदकर, मालवण अध्यक्ष महेश सारंग तसेच जिल्हा कार्यालयीन महामंत्री समर्थ राणे आदी उपस्थित होते. यावेळी सावंत यांनी फळ पीक विमा योजनेसाठी विरोधकांनी खूप प्रसिद्धी घेतली. परंतु प्रत्यक्षात ही रक्कम मिळण्यासाठी आपण १० ऑगस्ट २०२३ रोजी केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आयुक्त यांना पत्र दिले होते. तेथून हा विषय चाळवला गेला. मात्र, यासाठी खोलात जावून उमेश सावंत यांनी अभ्यास करीत कृषीचे वरिष्ठ अधिकारी आणि विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत आहे. मात्र, याची उमेश सावंत यांनी कुठेही प्रसिध्दी केली नाही, असे सांगितले.