
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 293 ग्रामपंचायतीच्या मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांचाही सकाळपासूनच मतदान करण्याकडे कल दिसून येत आहे. जिल्ह्यातील 325 पैकी 32 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित 293 ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
सरपंचपदाच्या 293 जागांसाठी 1 हजार 144 उमेदवार निवडणूक रिंगणात असून सदस्य पदासाठी 5 हजार 469 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.