गोव्यात पुढच्यावर्षी पोस्टल पेन्शन अदालत

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 21, 2023 10:12 AM
views 78  views

सिंधुदुर्गनगरी टपाल पेन्शनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी गोवा येथे 10 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता पोस्टल पेन्शन अदालत पोस्टमास्टर जनरल गोवा प्रदेश, पणजी येथे आयोजित केली आहे. गोवा पोस्टल क्षेत्रांध्ये महाराष्ट्र राज्यातील गोवा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत. ज्यांच्या सेवेत असताना मृत्यु झालेला आहे. 3 महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही आशा प्रकरणाचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकारी इत्यादी आणि निति प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतनधारकांनी प्रपत्रामध्ये आपले अर्ज महेश एन, लेखा अधिकारी सचिव, पेन्शन अदालत, क्षेत्रीय कार्यालय पणजी गोवा 403001 या पत्यावर 1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.