
कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवतीला टपाली मतमोजणी होणार असून टपाल मतमोजणी सुरु झाली आहे. महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे मतमोजणी केंद्रात दाखल झाले आहेत. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात एकूण १६४६ टपाली मतदान आहे. गृह मतदान ६०८ आहेत. कर्मचारी १०३८, सैनिकी मतदान २५ आहेत.