तळेरे वाघाचीवाडी प्रकल्प बाधितांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा

Edited by:
Published on: June 03, 2025 13:54 PM
views 183  views

कणकवली : तळेरे लघू पाटबंधारे प्रस्ताव क्रमांक ४२/९५ च्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी दालनात जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सबंधित विभागाचे अधिकारी, तळेरे प्रकल्पबाधित ग्रामस्थ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी लघु पाटबंधारे विभाग अधिकारी श्री. जाधव, श्री.  माणगावकर, भुसंपादन अधिकारी, पुनर्वसन अधिकारी, तळेरे एम.एस.ई.बी.चे अधिकारी,जि.प.सिंधुदुर्ग यांचे पाणी अधिकारी याच्या समक्ष तळेरे प्रकल्पग्रस्तांच्यावतीने तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच सौ.रिया चव्हाण, मोहन भोगले, अशोक भोगले, राजाराम तावडे, चंद्रकांत चव्हाण, मधूकर चव्हाण, विश्वनाथ चव्हाण, दशरथ बांदिवडेकर, निलेश पवार, अरविंद पवार हे उपस्थित होते. यावेळी समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनाचे जिल्हाधिकारी यांनी वाचन करून त्यानंतर प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा केली. 

प्रकल्पग्रस्तांच्यावतीने सर्व विषयावर मोहन भोगले, विश्वनाथ चव्हाण, निलेश पवार, अरविंद पवार, अशोक भोगले, चंद्रकांत चव्हाण, मधूकर चव्हाण यांनी प्रत्येक विषयाबाबत सविस्तर प्रश्न जिल्हाधिकारी यांना विचारले. यावेळी प्रत्येक प्रश्नांना योग्य तो न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले. व प्रत्येक प्रश्न लवकरात लवकर कसा मार्गी लागेल याबाबत संबंधित सर्व विभाग प्रमुखांना आदेश दिले. विषेशतः जे स्वेच्छा अनुदानाला वंचित आहेत त्यांना योग्य तो मोबदला लवकरात लवकर मिळेल असे सूचित करून आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जो न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे प्रकल्प बाधीत सर्व शेतक-यांना त्या प्रमाणे वाढीव रक्कम मिळेल असे जिल्हाधिकारी यांनी आश्वासित करून त्यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व कागदपञ प्रत्येक शेतक-यांनी लवकरात लवकर देण्याबाबत सूचना केल्या.

पालकमंत्री तथा मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी दिनांक २७/०३/२०२५ रोजी जनता दरबार मध्ये दिलेल्या निवेदनानुसार जिल्हाधिकारी यांना दिलेल्या सूचने प्रमाणे योग्य ती कार्यवाही करावयास सांगितल्या प्रमाणे झालेल्या या बैठकीत जवळ जवळ सर्वच प्रश्न सोडवले जातील अशी प्रकल्पग्रस्तांची खाञी होत आहे. आणि त्याबद्दल नितेश राणे व जिल्हाधिकारी यांचे आभार प्रकल्पग्रस्तांन कडून व्यक्त केले जात आहेत. याबद्दल दिलिप तळेकर आणि सरपंच हनुमंत तळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचेही वाघाच्यावाडीतील ग्रामस्थांनी धन्यवाद दिले.  आहेत. या प्रकल्पातील सर्व अडी अडचणी आपल्या विभागा कडून लवकरात लवकर सोडविल्या जातील असेही आश्वासन ल.पा.ओरोस विभाग प्रमुख श्री. जाधव यांनी दिले असल्याने त्यांचेही वाघाच्यावाडीतील ग्रामस्थांच्या वतीने समितीतील सर्वानी आभार मानून सभा समाधान कारक व निर्णायक झाल्याने उपस्थित वाघाच्यावाडीतील प्रकल्पग्रस्तान कडून व्यक्त करण्यात येत आहे. या विविध विषयांवर सकारात्मक सहकार्य केल्याबाबत समितीच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष मोहन भोगले यांच्याकडून समाधान व्यक्त करून यापुढेही असेच सहकार्य लाभू देत आणि वाघाच्यावाडीतील विकास कामाला चालना मिळूदेत अशी भावना व्यक्त केली.