
दोडामार्ग : वीज वितरणचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला असून उगाडे येथील विद्युत लाईवरील झाडे उगाडे येथील ग्रामस्थांनी स्वतः परिश्रमाने कट करून विद्युत वाहिनीवरील झाडे साफ केली आहेत. वीजवितरणला वारंवार सांगून देखील याकडे दुर्लक्ष केला गेल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.
पावसाळा सुरु होण्या आधीपासून उगाडे येथील ग्रामस्थांनी वारंवार दोडामार्ग विजवितरण विभागाला लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात निवेदन दिले. उगाडे गावातील विद्युत लाईनवरील झाडे कट करा त्यामुळे वारंवार वीज खंडीत होते. त्यामुळे आम्हा ग्रामस्थांना नाहक त्रास सोसावा लागतो, असे असताना देखील विजवितरण विभागाने याकडे दुर्लक्ष केला. त्याचा त्रास आता आम्ही ग्रामस्थ भोगत आहोत. विजवितरणच्या भोंगळ कारभाराचा विचार करता उगाडे ग्रामस्थांनी विद्युत लाईनवरील झाडे कट करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर विद्युत लाईनवरील सर्व झाडे कट केली.
यावेळी देवदत्त मेस्त्री, गिरीश मेस्त्री, आनंद राणे, राकेश ताटे, धोंडू जाधव, समीर गवस, माजी उपसरपंच सत्यवान पराडकर, गरमापंचायत सदस्य सखाराम राणे, विशाल राणे, रमेश, आत्माराम आदी ग्रामस्थांनी या कार्यात सहभाग घेतला. व तालुक्यातील इतर गावांना ही त्यांनी संदेश दिला की अशा प्रकारे आपल्या गावातील विद्युत लाईनवरील झाडे साफ करा विजवितरण काहीही करणार नाही. त्यांना कोणाचे सोयरसुतक ही नाही असे उगाडे ग्रामस्थ म्हणाले.