
मंडणगड : वेळास गावाकडून मुंबईत प्रवास करणाऱ्या महिलेची मंडणगड बसस्थानकात नजर चुकीने हरविलेले पैसे व दागीन्यांची बॅग मंडणगड पोलीसांच्या सर्तक कार्यपध्दतीमुळे महिलेस लगेच परत मिळाल्याने पोलीसांचे कामगिरीचे तालुक्यातून कौतूक होत आहे.
या घटनेसंदर्भात अधिक वृत्त असे की १२ ऑगस्ट २०२४ रोजी स्वाती संतोष शेट्ये वेळास गावातून सुटणाऱ्या मुंबई गाडीने प्रवासास निघाल्या. त्यांच्याकडे प्रवासात एक बॅग ज्यामध्ये 70000 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागीने असलेली अशी बॅग होती. मंडणगड स्टॅन्ड येथून सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास कोणी तरी घेऊन गेलेले आहे असे महिलेच्या लक्षात येताच तिने मंडणगड पोलीस स्थानकात या संबंधीत तातडीने याबद्दल तक्रार केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक तुळशीराम सावंत पोलीस हेडकॉन्स्टेबल धनजंय सावंत, पारधी, सासवे, मांडवकर, कदम या पोलीस पथकाने एस. टी स्टॅन्ड मंडणगड येथे भेट दिली. घटनास्थळी तात्काळ पोहोचून पथकाने घटनेच्या अनुशंगाने तांत्रिक तपासद्वारे पडताळणी केली असता तक्रारदार महिला या वेळास येथून मंडणगड एस टी स्टॅन्ड येथे येऊन त्यांना मुबंईत जायचे असल्याने त्या चुकून आपल्या बॅग घेऊन घुमरी गाडीत चढल्या होत्या व त्यांना गाडीत चढल्यावर माहित झाले कि हि गाडी घुमरीला जाणार आहे.
त्या गाडीतून पुन्हा खाली उतरून एस.टी. स्टॅन्ड मंडणगड येथे आल्या. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले कि आपले पैसे, व सोने असलेली ब्याग कोणीतरी घेऊन गेले आहे. पोलीसांनी महिलेने कथन केलेल्या घटनाक्रमाचा एस.टी स्टँड मंडणगड येथे सी.सी. टिव्ही कॅमेऱ्याद्वारे तांत्रिक तपास करीत मागोवा घेतला. पोलीसांनी घुमरी एस.टी मध्ये जाऊन शोध घेतला असता वरील रोख रक्कम आणि सोने असलेली बॅग मिळून आली. पोलीसांचे तपासात सापडलेली बॅग स्वाती शेट्ये यांच्या समक्ष खात्री करून सर्व मुद्धेमाल स्वाती शेट्ये यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.