देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथे प्रिया रामदास निकम या महिलेचा डोंगरवाडी,आचरा येथे साफसफाईचे काम करुन घरी परत येत असताना आरोपी याने आपले ताब्यातील मोटर सायकलवरुन येऊन सदरची मोटारसायकल रोडच्याबाजुस उभी करुन फिर्यादी हीचे ताब्यातील कापडी पिशवी जबरीने हिसकावून घेऊन त्यामध्ये असलेला मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण ६८००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना ९ जाने. घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,आचरा ते देवगड अशा जाणऱ्या रोडवरील घाटीवर, मुणगे,ता. देवगड येथे घडलेला असून या गुन्हयात फिर्यादी सौ. प्रिया रामदास निकम या डोंगरवाडी, आचरा येथे साफसफाईचे काम करुन घरी परत येत असताना आरोपीत याने आपले ताब्यातील मोटर सायकलवरुन येऊन सदरची मोटारसायकल रोडच्या बाजुस उभी करुन फिर्यादी हीचे ताब्यातील कापडी पिशवी जबरीने हिसकावुन घेवुन त्यामध्ये असलेला मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण ६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेलेला होता. हा गुन्हा उघडकीस आणणेच्या अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषणशाखेकडून पथक नियुक्त करण्यात आलेले होते.
सदर पथकाकडून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना आरोपीत हा गुन्हा घडल्यापासून आज पर्यंत प्रत्येक ठिकाणे बदलुन पोलीसांना वारंवारगुंगारा देत होता. तसेच नमुद आरोपी मोबाईल फोनचा देखील वापर करीत नव्हता. दि.२० जाने २०२५ रोजी गुन्ह्याचे तपासादरम्याने गोपनीय बातमीदारांकडुन विश्वसनिय बातमी मिळाली की, संशयीत आरोपी हा नालासोपारा, विरार, मुंबई येथून खाजगी बसने ओरोस खर्येवाडी, ता. कुडाळ येथील बस स्टॉपवर उतरणार आहे.त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ओरोस खर्येवाडी येथील बस स्टॉपजवळ सापळा रचला असता दि.२१ जाने. रोजी सकाळी ७.०० वाजण्याचे मानाने संशयीत आरोपी बसमधुन खाली उतरत असताना त्याला शिताफीने ताब्यात घेतले. गुन्ह्यातील जबरीने चोरुन नेलेला मुद्देमाल अनुक्रमे अॅन्ड्रॉईड मोबाईल व रोख रक्कम अंगझडतीमध्ये ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करीता पोलीस ठाणे देवगड येथे जमा केलेला आहे.
ही कारवाई वरीष्ठांकडुन प्राप्त आदेशानुसार राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग व . समीर भोसले, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्गयांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकी पोलीस हेड कॉन्स्टेबल डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, बस्त्याव डिसोझा व आशिष जामदार यांचे विशेष पथकाने केलेली आहे. या घटनेचा अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.