कणकवलीत पोलीस अलर्ट मोडवर

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 23, 2025 17:46 PM
views 318  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूकीमध्ये आता अधिकच रंगत वाढू लागला आहे. राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने पोलीस प्रशासनाने देखील सतर्क असल्याचे दिसत आहे.

कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली शहरात सायंकाळी पोलिसांचे चालत शहरात पायी पेट्रोलिंग करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे व स्टायकिंग पथक यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.