
सावंतवाडी: जिल्ह्यातील ६ पोलीस अंमलदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती देण्यात आली आहे. या सर्वांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये पोलीस अंमलदार प्रसाद सावंत यांना उपनिरीक्षक पदावर बढती देण्यात आली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जाते आहे.
यामध्ये पोलीस अंमलदार संदेश रमाकांत कुबल यांची वेंगुर्ला पोलीस ठाणे, पोलीस अंमलदार विलास बाबु गवस यांची पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग, पोलीस अंमलदार प्रसाद सुखदेव सावंत यांची जिविशा सिंधुदुर्ग, पोलीस अंमलदार विठ्ठल दिगंबर जोशी यांची नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग, पोलीस अंमलदार प्रमोद विष्णू मोरजकर यांची सावंतवाडी पोलीस ठाणे, पेरपेतीन हेन्री फर्नांडीस यांची पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग, संदेश बाबु सुर्वे यांची कणकवली पोलीस ठाणे येथे पदोन्नती मिळाली. पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर यांच्या हस्ते ही पदोन्नती बहाल करण्यात आली.











