
सिंधुदुर्गनगरी : आगामी विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज सून,लोक सभा निवडणुकी प्रमाणे ही निवडणुकाही शांततेत पार पाडण्यासाठी जील्हावासियांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.
विधान साभा निवडणूक पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.या वेळी ते बोलत होते.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेष रावले,सचिन हूंदळेकर,जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चीलावंत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री अग्रवाल म्हणाले निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी यांना निवडणुक शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी दक्षता घेण्याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड यांना निवडणुकिबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेनंतर संपूर्ण जिल्हयात अवैध्यरीत्या दारुची आणि इतर अंमली पदार्थाची वाहतुक होवु नये म्हणुन चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आलेले आहेत. गोवा राज्याच्या सीमेवर 09 आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर 01 असे एकुण 10 आंतरराज्य चेकपोस्ट आणि 07 आंतरजिल्हा चेकपोस्ट असे एकुण 17 चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आलेले आहेत. या चेकपोस्टवर दिवसरात्र बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. जिल्हयामध्ये 18 स्थायी सर्वेक्षण पथके आणि 10 भरारी पथके नेमण्यात आलेली असुन तेथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
निवडणुकिच्या बंदोबस्तकरीता जिल्हयातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचेसोबतच सीएपीएफ आणि एसएपीएफच्या एकुण 5 कंपनीची मागणी करण्यात आले असुन नमुद कंपनी पैकि 2 कंपन्या आज जिल्हयामध्ये हजर झालेल्या आहेत. या कंपन्या तसेच स्थानिक पोलीस, होमगार्ड यांचे रुट मार्च चे नियोजन करण्यात आलेले आहे.
७० लाखाची दारू तर १५ लाखाची रोकड जप्त
सर्व प्रभारी अधिकारी यांना जास्तीत जास्त अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या असुन दि.15/10/2024 रोजी कणकवली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैधरित्या दारुची वाहतुक करणा-या कंटेनरवर कारवाई करुन रु.70,00,000/- किंमतीची दारु आणि रु.40,00,000/- किंमतीचा कंटेनर असे एकुण रु.1,10,00,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच फोंडा चेकपोस्ट येथे दि.16/10/2024 रोजी रु.14,45,400/- रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. अवैधरित्या दारुची वाहतुक करणा-या तसेच विक्री करणा- या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत असुन नमुद मुद्देमाल कोठुन आणला आणि कोणासाठी आणला हे सखोल तपास करुन आरोपी निष्पन्न करण्यात येत आहे. यापुर्वी लोकसभा निवडणुक -2024 मध्ये आचारसंहिता कालावधीत अवैधरित्या दारुची वाहतुक करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करुन गोवा राज्यातील अवैधरित्या विक्री करणारे आरोपी निष्पन्न करुन त्यांचेवर कारवाई केलेली आहे आणि संबंधित आरोपीवर लक्ष ठेवणेसाठी संबंधित राज्यातील पोलीस अधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे.
जिल्हयामध्ये एकुण 78 पाहिजे असणारे आरोपी व 09 फरारी आरोपी असुन त्यांचा शोध घेवुन अटक करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारी पार्श्वभुमी असणारे आणि निवडणुक कालावधीत त्रासदायक ठरणा-या एकूण 798 लोकांवर प्रचलित कायाद्याप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गोवा व कर्नाटक राज्यातील पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस पोलीस अधीक्षक स्तरावर संयुक्त बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे स्तरावर बैठका घेण्याचे नियोजनदेखील करण्यात आलेले आहे.
जिल्हयातील सर्व पोलीस पाटील यांच्या बैठका घेण्यात आलेल्या असुन नमुद बैठकिमध्ये निवडणुका शांततेत पार पाडण्याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. अशाप्रकारे जिल्हयातील विधानसभा निवडणुक शांततेत पार पडावी म्हणुन पोलीस अल सज्ज असुन सर्व नागरिकांनी जिल्हयामध्ये शांतता ठेवुन सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.