
सावंतवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या अनुषंगाने सायंकाळी 4.30 वाजता सावंतवाडी मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेमध्ये भेट देणार आहेत. दरम्यान, कणकवली येथील जाहीर सभेत त्यांनी राणेंवर प्रहार केला होता. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत टीका केल्यास अंधारेंना जिल्हा बाहेर जावू देणार नाही असा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांना अलर्ट राहत दंगल काबू पथकाच्या दोन गाड्या सावंतवाडी शहरात तैनात केल्या आहेत. येथील हॉटेलमध्ये त्यांची पत्रकार परिषद होणार असून हॉटेल बाहेर देखील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.