सावंतवाडीत २७ ऑगस्टला कै. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धा

Edited by:
Published on: August 14, 2023 18:08 PM
views 49  views

सावंतवाडी : ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व कोकणभूषण स्वर्गीय विद्याधर भागवत  यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रविवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात कै विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 


अठरा वर्षे वयावरील या स्पर्धेसाठी कविता स्वरचित मराठीत असावी. एका कविला एकच स्पर्धा सादर करता येणार आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटक सीमा भागातील कवींना आपली स्वरचित कविता सादर करता येणार आहे.  

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी आपली नावे २२ ऑगस्ट पर्यंत कवयित्री उषा परब  ९४२३८१८८२८ यांच्याकडे नोंद करावयाची आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांक कवीस रोख रूपये ५०१ व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रोख रुपये ३०१ व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांकास रोख रुपये २०१ व प्रशस्तीपत्रक तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकास रुपये १०१  व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तसेच काव्यवाचन स्पर्धेतील सहभागी असणाऱ्या प्रत्येक कवीला सहभाग प्रमाणपत्र आयोजकांतर्फे दिले जाणार असून उत्कृष्ट कविता आरती मासिकातून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 


 कवी- कवयित्रींनी तसेच साहित्य रसिकांनी काव्यवाचन स्पर्धेत सहभाग घेऊन मराठी भाषेला अभिवादन करावे असे आवाहन उषा परब, प्रभाकर भागवत, भरत गावडे  यांनी केले आहे.