
सावंतवाडी : थोर विचारवंत व ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे , ज्येष्ठ कांदबरीकार उत्तम कांबळे व आजचे आघाडीचे पत्रकार निरंजन टकले यांच्या हस्ते सावंतवाडी येथील कवयित्री इंजि. स्नेहा विठ्ठल कदम यांना त्यांच्या 'शिल्लक भितीच्या गर्भ कोषातून' या काव्यसंग्रहाला कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय नाशिकचा 'कवी भिमराव कोते काव्य पुरस्कार' नुकताच नाशिक येथे प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवा कवयित्री स्नेहा कदमला सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
स्नेहा कदम येथील कवी विठ्ठल कदम यांच्या सुकन्या असून आज त्यांच्या कविता चर्चेचा विषय ठरत आहेत. स्नेहा कदमच्या यशाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात आले आहे.