'PM किसान समृद्धी'मुळे शेतकऱ्यांची थांबेल फसवणूक : राजन तेली

Edited by: विनायक गावस
Published on: July 27, 2023 18:34 PM
views 80  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना एकाच छताखाली योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी पंतप्रधान किसान समृद्धी योजना सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल आणि एकाच छताखाली सुविधा उपलब्ध होणार आहेत त्यांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले.


सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या मळगाव येथील शाखेत पंतप्रधान किसान समृद्धी योजना केंद्र शुभारंभ आणि राजस्थान येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १ लाख २५ हजार केंद्राचा शुभारंभ केला त्या ऑनलाईन शुभारंभ प्रसंगी तेली बोलत होते. 


मळगाव येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या माध्यमातून माजी आमदार राजन तेली  यांच्या उपस्थितीत किसान समृद्धी केंद्राचा उदघाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक तथा आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर,खरेदी विक्री संघ तज्ञसंचालक अभिमन्यू लोंढे, माजी सभापती राजू परब,संघाचे संचालक विनायक राऊळ, कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग,अनिकेत रेडकर, पंढरीनाथ गावकर, नंदा सावळ, राजन जाधव, गणेशप्रसाद पेडणेकर, टिळक सावळ, जगन्नाथ राणे, नीलकंठ बुगडे, विद्या करंगुटकर, सचिन मोरे, राधाकृष्ण केरकर, तेजपाल सावळ, शामसुंदर कुंभार , कृषी सहायक छाया मेस्त्री आदी उपस्थित होते.


राजन तेली म्हणाले, शेतकऱ्यांना खंत, बियाणे, कीटक नाशक औषधे, माती परीक्षण अशा विविध सेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. पंतप्रधान पीक विमा, शेतकरी सन्मान योजना यापूर्वी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा.

यावेळी मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर व संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांनी शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि सहकाऱ्यांनाहि सांगावे असे आवाहन केले. जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले पाहिजेत असे आवाहन केले.

यावेळी शेतकरी बाळा बुगडे   जगन्नाथ राणे दीपक जोशी  प्रसाद नाईक सुखदेव राऊळ तात्या लातये रितेश राऊळ अनिकेत रेडकर पंढरी गावकर  प्रकाश जाधव राजन जाधव बाबना सातार्डेकर शत्रुघ्न मातोंडकर सुभाष सावळ महेश धुरी उपस्थित होते.