नवांगतांचे दोडामार्ग मध्ये आनंददायी स्वागत...!

Edited by:
Published on: June 15, 2023 15:43 PM
views 159  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात गुरवारी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी गावोगावी प्रभातफेरीने नवागतांचे  शाळेत वाद्य गजरात, पुष्पगच्छ  देवून, ओवाळणी करुन तोंड गोड करून स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पहील्यांदाच शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांना सोडायला आलेल्या पालक वर्गाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.


बोडदे शाळेत जिलेबी भरवून स्वागत..!

तालुक्यातील विवधांगी उपक्रम राबविणाऱ्या बोडदे शाळेत सुद्धा अशाच हटके आणि आनंददायी पद्धतीनं नवांगतांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आली.  वर्ग पूर्व तयारी मेळावा क्र. २ मधुन पहिलीत दाखल होणार्‍या मुलांची बौध्दीक व शारिरीक चाचणीही पार पडली. याठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती, पलक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. श्रीकृष्ण गवस , महेश पारधी , पूजा पारधी , पूजा सूतार , स्नेहल पारधी , साक्षी नाईक , अशोक गवस , अश्वीनी गवस , आशा गवस , आरुषी नाईक,त्रुतुजा गवस, गौरी गवस , चंद्रकला पारधी, शितल गवस  , शितल पारधी , वैशाली परब यांसह मुख्याध्यापक महेश नाईक , पूनम खोराटे , सचिन घाडी व अन्य मान्यवर उपस्थित होते.