60 झाडांच वृक्षारोपण | विकास सावंत यांच्या वाढदिनी आरपीडीचा अभिनव उपक्रम

Edited by: विनायक गावस
Published on: June 23, 2023 14:53 PM
views 171  views

सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांचा वाढदिवसानिमित्त आर. पी. डी.प्रशालेच्या परिसरात सुमारे 60 झाडांच वृक्षांरोपण करून अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. विकास सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही. बी.नाईक, शालेय समिती अध्यक्ष प्रा.डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी.एल. नाईक व संस्था सदस्य श्री अमोल सावंत, श्री चं. मु. सावंत,श्री संदीप राणे ,प्रा. सतीश बागवे,माजी मुख्याध्यापिका सोनाली सावंत, माजी प्राचार्य कृष्णा परब, माजी उपप्राचार्य प्रा.नारायण देवकर, प्रा.बाळासाहेब नंद्दीहळी,प्रा.धीरेंद्र जाधव होळीकर ,प्रा.शामराव माने,प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश धोंढ,  उपमुख्याध्यापक अरविंद साळगावकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक ,पर्यवेक्षक प्रल्हाद सावंत तसेच उच्च माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग,माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.