नरेंद्र डोंगरात वृक्षारोपण

Edited by:
Published on: June 16, 2024 13:07 PM
views 160  views

सावंतवाडी : अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग तर्फे नरेंद्र डोंगर वनउद्यान येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वड,पिंपळ,आवळा,बेल,सीताफळ,कडुलिंब,साग,पेरु,बहावा,चिकू आदी वृक्षांची रोपे लावण्यात आली. या कार्यक्रमासाठी सावंतवाडी वनविभागाचे वनपाल दत्तात्रय पाटील व त्यांच्या सहका-यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या वृक्षारोपण सोहळ्यावेळी अभिनवचे पदाधिकारी राजू केळूसकर,तुषार विचारे,अण्णा म्हापसेकर,किशोर चिटणीस,जितेंद्र मोरजकर,अमित अरवारी,प्रा.केदार म्हसकर आदी उपस्थित होते.