
वैभववाडी : तालुक्यातील आचिर्णे या गावी वृक्षारोपण करण्यात आले. मुंबईतील उद्योजक प्रभानंद रावराणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला .गावातील विविध ठिकाणी २००हून अधिक झाडे लावण्यात आली.
वातावरणातील बदलामुळे वृक्ष संवर्धन काळाची गरज बनली आहे.यावर्षी उन्हाळ्यात कमालीची उष्णता वाढली होती.ही बाब लक्षात घेऊन श्री रावराणे यांनी आपल्या गावात यावर्षीच्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला होता.तो त्यांनी पुर्णही केला.गावात वडाची १००,आवळा २५,फणस २०, कडुलिंब २०,नारळ७० अशी २३५ रोपांचे शेतकऱ्यांना वाटप केले.ही रोपे ग्रामपंचायत, आचिर्णे रासाई देवी मंदिर परीसरासह गावातील शेतकऱ्यांच्या परड्यात या रोपांची लागवड केली.प्रत्येक नागरीकांने दरवर्षी किमान पाच झाडे लावली पाहिजेत.ज्याद्वारे पर्यावरणाचा -हास कमी होण्यास मदत होईल.तसेच वातावरण समतोल राखण्यासाठी उपयुक्त ठरेल असं मत श्री रावराणे यांनी व्यक्त केले.यावेळी डॉ सुनील रावराणे,शिवाजी कडू, दत्तात्रय रावराणे,श्रीकांत रावराणे , गणपत रावराणे, तुकाराम रावराणे,धोंडू जाधव, लक्ष्मण रावराणे,उत्तम सुतार ,सुवर्णा कडु यासह गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.