रिक्षाचालकांनी बुजवले खड्डे | ग्रामपंचायतवर नाराजी

Edited by:
Published on: July 01, 2024 06:28 AM
views 361  views

बांदा : बांदा पत्रादेवी मार्गावर पडलेले खड्डे रविवारी बांदेश्वर मंदिर रिक्षा संघटनेने श्रमदानातून बुजवीत बांदा ग्रामपंचायतवर नाराजीचे सुरु व्यक्त केले. बांदा गोवा पत्रादेवीकडे जाणाऱ्या मार्गवर पावसाळ्या पूर्वी खड्डे पडून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. बांदा ग्रामपंचायतने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने सर्वच वाहतूकदारांनी शासन व ग्रामपंचायतवर नाराजी व्यक्त केली होती.

आज ना उद्या रस्त्यावरील पडलेले खड्डे ग्रामपंचायत बुजवेल या आशेवर असलेल्या बांदेश्वर मंदिर कडील रिक्षा संघटनेने श्रमदानातून रस्त्यात पडलेल्या खड्यात चिऱ्याचे तुकडे टाकून खड्डे बुजवले.

यावेळी बांदेश्वर मंदिर कडील रिक्षा संघटनेचे अध्यक्ष उल्हास शेवडे, सुनील माजगावकर, दशरथ परब, संजय नाईक, अनिल म्हाडगुत, अनिल माजगावकर, देवानंद कुबल, प्रशांत म्हाडेश्वर, विशू पावसकर आदी उपस्थित होते. व याहिपुढे आम्ही बांदेश्वर मंदिर रिक्षा संघटना स्वतः समाजिक कार्यात  सहभागी होणार आहे आणि असेच सामाजिक कार्य करत राहणार असे सांगितले.