तळवडेत पिंपळ रस्त्यावर

सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील वाहतूक ठप्प
Edited by: दिपेश परब
Published on: July 25, 2024 13:26 PM
views 285  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तुळस- तळवडे मार्गे सावंतवाडी या मुख्य रस्त्यावर तळवडे गेट नजीक  वळणावर रस्त्याच्या बाजूला असलेले पिंपळाचे मोठे झाड रस्त्यावर पडून या मार्गवरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक तळवडे मातोंड- तुळस पलतड मार्गे वेंगुर्ला अशी वळवण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी झाडे पडुन याठिकाणचा वीज पुरवठाही खंडित झाला आहे. सायंकाळी ६ च्या दरम्याने आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी मोठी हानी झाली आहे.