माजगावात प्लास्टिक गोळा करून पीक अप डे

सरपंच डॉ. अर्चना सावंत यांचा कौतुकास्पद उपक्रम
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 12, 2023 17:06 PM
views 404  views

सावंतवाडी : माजगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणच्या परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी माजगाव ग्रामपंचायत सरपंच डॉ. अर्चना सावंत यांनी शनिवारी गावातील प्लास्टिक गोळा करून पीक अप डे उपक्रम साजरा केला.

या उपक्रमासाठी सकाळी 10 वा माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी एकत्र आले होते. माजगावातील सर्व वाडी, रस्ते मंदिराजवळील परिसर सातजांभळ, मळगाव घाटी, अशा सर्व भागातील प्लास्टिक एकत्र करून त्यांची व्हिलेवाट लावण्यात आली.

यावेळी सरपंच सौ. अर्चना सावंत, उपसरपंच संतोष वेजरे, सर्व सदस्य, ग्राम विकास अधिकारी संदीप गोसावी, माजी जि. प.  अध्यक्ष व सदस्या सौ. रेश्मा सावंत, जि. प. शळेतील सर्व शिक्षक, आरोग्य अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी, हायस्कूलमधील मुले, गावातील ग्रामस्थ या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी प्लास्टिकचा वापर टाळणे ही काळाची गरज आहे अशी माहिती देऊन मार्गदर्शन केले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मुलांनी पर्यावरण पूरक पिशव्या व रोपे वाटप करण्यात आली. त्याला लोकांनी साथ दिली याबद्दल आभार मानले.