कुडाळमध्ये 19 ऑगस्टपासून फोटो प्रदर्शन

भूषण जडये फोटोग्राफी स्कुलचे आयोजन
Edited by: ब्युरो
Published on: August 16, 2023 16:34 PM
views 145  views

कुडाळ : येथील भूषण जडये स्कुल ऑफ फोटोग्राफी यांच्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधून १९ ऑगस्टला कुडाळ येथे फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९. २० आणि २१ ऑगस्ट रोजी हे फोटो प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. अशी माहिती  फोटोग्राफी स्कुलचे संचालक भूषण जडये यांनी  दिली.

भूषण जडये यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, १९ ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन आहे. त्या निमित्ताने या फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  शनिवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता या प्रदर्शनाचे उदघाटन सावंतवाडी येथील बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट कॉलेजचे प्राचार्य प्रकाश पेठे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिद्ध मानोसोपचार तज्ज्ञ आणि फोटोग्राफर डॉ. रुपेश धुरी हे उपस्थित राहणार आहेत. भूषण जडये स्कुल ऑफ फोटोग्राफी, आशीर्वाद भवन, पोस्ट कार्यालयाजवळ येथे हे प्रदशन भरणार आहे. सकाळी ९ ते सायंकाची ७ अशी या प्रदर्शनाची वेळ आहे.

भूषण जडये स्कुल ऑफ फोटोग्राफी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले फोटोग्राफी स्कुल असून यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने फोटोग्राफी शिकवली जाते. आतापर्यंत या स्कुल मधून दोन बॅचेस बाहेर पडल्या आहेत. या दोन बॅचेस मधील विद्यार्थ्यांनी काढलेले निवडक फोटो या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. या विद्यार्थ्यंना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांची फोटोग्राफी लोकांच्या नजरेत यावी असा या प्रदर्शनामागचा उद्देश आहे. १९, २० आणि २१ ऑगस्ट असे तीन दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. त्यामुळे  या प्रदर्शनाला जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी असे आवाहन भूषण जडये स्कुल ऑफ फोटोग्राफीचे संचालक भूषण जडये आणि सौ. आर्या जडये यांनी केले आहे.