
कणकवली : फोटोग्राफर असोसिएशन कणकवली आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिन एचपीसीएल सभागृह कणकवली कॉलेज कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घटन सकाळी १० वाजता होणार आहे. कार्यक्रमाला कणकवली पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी विजयकुमार वळंजू, रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड . राजेंद्र रावराणे, कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालिंगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेच्या 'आपलं कोकण' या स्पर्धेचे फोटो प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला व प्रदर्शनाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन फोटोग्राफर असोसिएशन कणकवलीचे अध्यक्ष विनायक पारधिये व संघटनेच्या सर्व सभासदांच्या मार्फत करण्यात आले आहे.