तळकट इथं लोकसहभाग - श्रमदानातून रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास..!

Edited by: संदीप देसाई
Published on: September 07, 2023 13:40 PM
views 49  views

दोडामार्ग : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविणाऱ्या तळकट ग्रामपंचायतने पुन्हा एकदा गावात लोक सहभागाने रस्ते स्वच्छता मोहीम राबविली आहे. देऊळवाडी ते कळणे रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेली व वाहन चालकांना त्रास देणारी हे झाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने तोडत सदर रस्ता वाहतुकीस निर्धोक केला आहे.

या रस्त्यावर हल्लीच कदम बस चालू करण्यात आली आहे. त्या  चालकांनाही बस चालवतान अवघड वळणावरती समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे त्रास होत होता.  त्यामुळे तळकट गावातील युवकांनी सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली पूर्ण रस्त्याची साफसफाई केली.  रस्त्यावर आलेली मोठ मोठी झाडे यावेळी साफसफाई करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला .

यावेळी तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, ग्रामपंचायत कर्मचारी बाळू देसाई, अरविंद सावंत, ग्रामपंचायत सदस्य विवेक मळीक, विकास राऊळ, महेश भिसे, सूर्यकांत शिरोडकर, स्वप्निल घाडी, बाळू घाडी, महादेव सावंत, अक्षय राऊळ, संदेश डांगी, आनंद घाडी इत्यादी युवक ग्रामस्थ उपस्थित होते.