सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरच जनतेचे आरोग्य अवलंबून : गितांजली नाईक

Edited by: संदीप देसाई
Published on: July 22, 2023 15:13 PM
views 286  views

कुडाळ :  सफाई कर्मचारी हे शहरातील जनतेचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी सातत्याने काम करत असतात. त्यासाठी मुळात त्यांचे आरोग्य उत्तम असणे खूप महत्त्वाचे आहे, त्यांची आरोग्य तपासणी नियमित होणे गरजेचे आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरच सर्वांचे आरोग्य अवलंबून असते असे प्रतिपादन साद फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक यांनी व्यक्त केलं. एल. एम. नाईक जन्मदिनानिमित्त कुडाळ नगरपंचायत आणि साद फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सफाई कर्मचाऱ्यांच्या मोफत तपासणी शिबिराच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नगरपंचायत कुडाळ च्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर, मुख्याधिकारी अरविंद नातू, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, साद फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक, माजी नगराध्यक्षा  आफरीन करोल, नगरसेविका श्रेया गवंडे, ज्योती जळवी, श्रुती वर्दम,नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, गटनेते विलास कुडाळकर, डॉ. कुलकर्णी, डॉ. सुजय निगुडकर, डॉ. राशिका  निगुडकर, डॉ. नितीन  बोडके, डॉ. प्रविण बोडके, डॉ. करंबळेकर  आदी उपस्थित होते.शिबिराचे उदघाट्न नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या हस्ते झाले. प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक यांचे वडील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त एल. एम. नाईक यांच्या स्मृतप्रित्यर्थ स्थापन केलेल्या साद फाउंडेशन  फाऊंडेशन सिंधुदुर्ग व नगरपंचायत कुडाळ यांच्या वतीने जिल्हा व महिला बाल रुग्णालय, कुडाळ  नगपरपंचायतच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांची तपासणी  करण्यात आली. या प्रसंगी मुख्याधिकारी अरविंद नातू, नगराध्यक्षा खटावकर, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी कर्मचाऱ्यांना स्वच्छता आणि आरोग्यबद्द्ल सूचना व मार्गदर्शन केले.

        यावेळी कर्मचाऱ्यांच्या  रक्ताच्या, मधुमेह,कर्करोग, x-ray, इसीजी, कोलेस्ट्रोल, इत्यादी,  सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. त्यावर  गोळ्या व आवश्यक  उपचार केले गेले. एकूण ६० सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी यांनी शिबिराचा लाभ घेतला. विशेषतः महिलांना आरोग्यविषयक माहिती  दिली गेली. सर्वाची आभा कार्ड काढण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. यावेळी रुग्णालयला आवश्यक हिमोग्लोबीन तपासणी मशीन साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि नगरपंचायत कुडाळ यांनी संयुक्तपणे  जिल्हा महिला व बाल रुग्णालयाला भेट स्वरूपात देण्यात आली. रुग्णालयचे प्रमुख डॉ. वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ कुलकर्णी यांच्या पथकाने कमर्चाऱ्यांच्या तपासणी चे चांगल्याप्रकारे काम पाहिले. जिल्हा समन्वयक प्रशांत जाधव यांनी सुद्धा उत्तम सहकार्य केल्याबद्दल साद फाउंडेशन सिंधुदुर्ग यांजकडून मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सफाई कर्मचारी यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी केली. उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे, कर्मचारी  आणि तपासणीचा लाभ घेतलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे आभार गितांजली नाईक यांनी मानले. तसेच या दिवशी साद फाऊंडेशन तर्फे एल.एम.नाईक  यांच्या मूळ गावी पाडलोस केणीवाडा येथील प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणायत आले.