मुंबई - गोवा महामार्गावर पादचाऱ्याला धडक

रायडर्सच्या बेदरकारपणावर स्थानिकांचा संताप
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 19, 2025 12:03 PM
views 133  views

कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावर पावशी येथे एका बाईक रायडरने पादचाऱ्याला धडक दिली. या धडकेत पादचारी जखमी झाला असून संबंधित रायडरला किरकोळ दुखापत झाली आहे. 


याबाबत सविस्तर वृत्त असे की, बाईक रायडिंग करणाऱ्या लडाख येथील रायडर्सचा एक ग्रुप भ्रमंतीसाठी निघाला होता. मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथे या रायडर्सचा ग्रुप आला असता पादचाऱ्याला त्यातील एका रायडरची धडक बसली. या धडकेत पादचारी जखमी झाला असून संबंधित रायडरला किरकोळ दुखापत झाली. या अपघातातील जखमी पादचाऱ्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत कुडाळ पोलिसांत कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. 


मुंबई - गोवा महामार्गावर रायडर्सचे प्रमाण सध्या खूपच वाढले आहे. कित्येकदा हे रायडर्स परराज्यातील असतात. त्यामुळे येथील रस्त्यांचा किंवा गावांचा त्यांना कोणताही अंदाज नसतो. असे असताना देखील ते नेहमी बेदरकारपणे महामार्गावरून बाईक चालवतात. त्यामुळे स्थानिक वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शिवाय त्यांच्या दुचाकीच्या कर्णकर्कश्य आवाजामुळे स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. आज पावशी येथे घडलेली अपघाताची घटना गंभीर असून या रायडर्सना कुठेतरी चाप लावावा अशी मागणी सध्या स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांमधून होत आहे.