देवगड तीर्लोट मोहूळवाडी मार्गावर प्रवासी फेरी सुरू

Edited by:
Published on: November 26, 2024 19:52 PM
views 205  views

देवगड : देवगड तीर्लोट वरचे मोहूळवाडी मार्गावर बस फेरी सुरू व्हावी यासाठी आ.नितेश राणे यांच्याकडे मागणी गावचे सरपंच सौ.रितिका जुवाटकर संजय बोबडी, रामकृष्ण जुवाटकर यांनी ही मागणीआ.नितेश राणे यांच्याकडे कडे केली होती.

तिर्लोट वरचे मोहोळ वाडी या ठिकाणी एसटी प्रवासी सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती.या संदर्भात आ.नितेश राणे यांच्याकडे मागणीतून पूर्ण करून घेण्यात आली आहे.व या मार्गावर देवगड आगाराची प्रवासी फेरी सुरू कराण्यात आली आहे.

या प्रवासी फेरीचा शुभारंभ गावचे प्रथम नागरिक रितिका जुवाटकर व अन्य मान्यवरांचा उपस्थितीत विधिवत एसटी पूजन करून करण्यात आले.उपसरपंच राजन घाडी,अनिल तिर्लोटकर,दिपक जुवाटकर अनिल सावंत,चंद्रकांत घाडी,मकरंद सावंत.तसेच तिर्लोट मोहूळवाडी चे चे ५० हुन अधिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.