वैभववाडी : कुसूर चौधरीवाडी येथील राजाराम चौधरी, वय 95 यांचं आज वृद्धापकाळाने शनिवारी सकाळी निधन झाले. चौधरी यांनी गावच्या विकास सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून काम केले होते.
तसेच अनेक वर्षे सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावात काम पाहिले होते. गावच्या राजकीय, धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुली, सुना ,जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. डेकोरेटर जयदास चौधरी यांचे ते आजोबा होतं.