परुळेबाजार ग्रा.पं.ला वसंतराव नाईक शेती ग्राम पुरस्कार

Edited by: दिपेश परब
Published on: July 02, 2024 11:24 AM
views 168  views

वेंगुर्ले : परुळेबाजार ग्रामपंचायतीला वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्राम पुरस्कार १ जुलै २०२४ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वसंतराव नाईक कृषीसंशोधन व विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या मार्फत दिला जाणारा हा ग्राम स्तरावरील उल्लेखनीय उपक्रमांबद्दलचा पुरस्कार परुळेबाजार ग्रामपंचायतला जाहीर झाला होता. 

   १ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ वा जन्मदिन व कृषी दिना निमिताने मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास कृषीमंत्री धनंजय मुंडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलगुरू  प्रशांतकुमार गुलाबाराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 

     यावेळी परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, ग्रामसेवक शरद शिंदे, उपसरपंच राजू दुधवडकर, माजी सभापती निलेश सामंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष  तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रसाद पाटकर उपस्थित होते.