
नांदेड : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचली आहे. नांदेडमधून या यात्रेला सुरुवात झालीय. देशभरातून या यात्रेत नागरिकांचा सहभाग आहे. यात कोकणातील पदाधिकारी मागे नाहीत. सिंधुदुर्गातील जिल्हाध्यक्ष इरशाद शेख, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, सुगंधा साटम, प्रकाश जैतापकर, प्रदीप मांजरेकर, सुनील पाटील, मनोज रावराणे ,विजय सावंत, नगराध्यक्ष अफरीन करोल, मंदार शिरसाट सहभागी झालेत. महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी स्वतः 10 दिवस या यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्या सोबत चालणार आहेत.
दरम्यान, साक्षी वंजारी यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. नाना पटोले यांना भगवद्गीता भेटहि दिली. काही वेळ पक्ष संघटनेबाबत चर्चाही झाली.
भारत जोडो यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद जनतेतून मिळत आहेत. लाखाहून अधिक जनसमुदाय दररोज यात्रेत सहभागी होत आहे भारत जोडो यात्रेने देशाला नवी दिशा मिळाली आहे. यात्रेतून काँग्रेस पक्षाला उभारी मिळणार आहे. महाराष्ट्रात यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडात यात्रेचं चोख नियोजन करण्यात आलंय. जेवणापासून राहण्याची उत्तम सोय, महिलांसाठी असलेलं सुरक्षित वातावरण विशेष आहे. राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रा सर्वसामान्यांना भावत असल्याची प्रतिक्रिया साक्षी वंजारी यांनी कोकणसाद LIVE शी बोलताना व्यक्त केलाय.