
सावंतवाडी : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयाव्दारे सावंतवाडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय रायफल शुटिंग क्रीडा स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांमध्ये पार्थ समीर सावंत तर मुलीमध्ये खुशल संभाजी सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. याबाबतची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी केले. यावेळी निवासी नायब तहसिलदार मनोज मुसळे, स्वप्नील प्रभु, मांगले रायफल शुटिंग प्रशिक्षक, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कनिष्ठ लिपीक पंढरीनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये मिलाग्रीस हायस्कुल सावंतवाडी, नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करुळ, डॉन बॉस्को अँड ज्युनिअर कॉलेज ओरोस, राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्यूनिअर कॉलेज सावंतवाडी, महात्मा गांधी विदयामंदिर हायस्कुल सातार्डा, वेंगुर्ला हायस्कुल वेंगुर्ला, न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविदयालय कसाल, खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुलअँड डॉ. व्ही.के .तोरसकर ज्यू.कॉलेज बांदा, ए. एस. डी. टोपीवाला हायस्कुल मालवण, कणकवली कॉलेज कणकवली, स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण, यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुल, सावंतवाडी, मदर तेरेसा स्कूल, न्यू इंग्लिश स्कुल आणि ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट, मदर क्विन्स् इंग्लिश स्कुल सावंतवाडी, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, आयडियल इंग्लिश स्कूल अँड जुनिअर कॉलेज वरवडे, संत. उर्सुला स्कूल, बी.के.सी. कॉलेज वेंगुर्ला या शाळांमधुन एकुण 53 खेळाडु उपस्थित होते.
स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच व तांत्रिक अधिकार कांचन उपरकर, प्रशांत सावंत, दिपक सावंत या पंचाच्या सहकार्याने स्पर्धा पार पाडण्यात आल्या. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारा जिल्हास्तरीय शालेय रायफल शुटिंग क्रीडा स्पर्धा उपरकर शुटिंग रेंज, सावंतवाडी येथे यशस्वीरित्या पार पाडली. स्पर्धेचा निकाल 14 वर्षाखालील मुले ओपन साईट, प्रथम- पार्थ समीर सावंत , द्वितीय- सुयश श्रीपाद गावकर, तृतीय- ओंकार शेखर मिस्त्री. 14 वर्षाखालील मुले पीप साईट, प्रथम- खुशल संभाजी सावंत, द्वितीय- शिवम नरेंद्र चव्हाण, तृतीय-गौरव दत्तप्रसाद आजगावकर. 14 वर्षाखालील मुले पिस्तुल, प्रथम- परशुराम तिळाजी जाधव , द्वितीय- स्वामी समर्थ संजय बगळे. 14 वर्षाखालील मुली ओपन साईट, प्रथम- कृष्णाई नंदकिशोर रावराणे , द्वितीय- स्वराली विनायक साठे. 14 वर्षाखालील मुली पिस्तुल, प्रथम- अन्विता अनाजी सावंत, द्वितीय- अन्वी मेघश्याम भांगले. 17 वर्षाखालील मुले ओपन साईट, प्रथम- सिदृधेश सुनील सांडिम, द्वितीय- सुरज दिपक शिंदे. 17 वर्षाखालील मुले पीप साईट, प्रथम- फिलीप बेंटोलीस फर्नांडिस. 17 वर्षाखालील मुले पिस्तुल, प्रथम-आयुष दत्तप्रसाद पाटणकर. 17 वर्षाखालील मुली ओपन साईट, प्रथम- तन्वी संतोष पारकर , द्वितीय- स्वरांगी संदिप साटम, तृतीय- श्रावणी सुर्यकांत गडेकर, 17 वर्षाखालील मुली पिस्तुल, प्रथम- श्रिया अतुल नाखरे. 19 वर्षाखालील मुले ओपन साईट, प्रथम- पार्थ नवनीत देसाई, द्वितीय- जतीन मधुकर चव्हाण, तृतीय- साहिल सुभाष तावडे. 19 वर्षाखालील मुले पीप साईट, प्रथम- शमित श्याम लाखे, द्वितीय- आदेश अविनाश हाक्के. 19 वर्षाखालील मुली ओपन साईट, प्रथम- मानसी निलेश करलकर, द्वितीय- प्रणाली प्रकाश कवठणकर, तृतीय- वैष्णवी विजय गोवेकर. 19 वर्षाखालील मुली पीप साईट, प्रथम- वैष्णवी गोविंद भांगले, द्वितीय- सानिया सुदेश आंगचेकर. 19 वर्षाखालील मुली पिस्तुल, प्रथम-राजकूमारी हिंदुस्तानी संजय बगळे, द्वितीय क्रमांक स्वरांगी सदानंद आंगचेकर यांनी प्राप्त केला आहे.