
देवगड : देवगड येथील तळेबाजार बाजारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा अप्रिय घटना घडू नये या अनुषंगाने देवगड पोलीस ठाण्यातील पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारात वाहतुकीची कोंडी होऊ नये अथवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी देवगड वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांमार्फत कारवाई करण्यात आली आहे.
मे महिना असल्यामुळे बरेच चाकरमानी सध्या गावी आले आहेत. तळेबाजार येथे रात्रीच्या वेळी सात ते आठ या वेळी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच या बाजारात मोठ्या प्रमाणात वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक प्रचंड गर्दी करतात. मुंबईकर चाकरमानी स्थानिक ग्राहक यामुळे मे महिन्यात सात ते आठच्या दरम्याने बाजारात खूप गर्दी होते. यावेळी वाहतूक पोलीस प्रवीण सावंत यांच्या समवेत पोलीस निलेश पाटील अतिशय सुयोग्य पद्धतीने वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन पार्किंग या सर्व सुविधांचे पालन वाहन चालकांनी करण्यासाठी ही कारवाई केली आहे.
तळेबाजार या ठिकाणी वाहतूक पोलीस प्रवीण सावंत यांनी बजावलेल्या या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
देवगड पोलिसांनी बजावली भूमिका प्रसंगी संपूर्ण एस्टिस्टँड परिसरात कोठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये या पद्धतीने वाहने उभी करण्याचे नियोजन देखील करण्यात येत होते. तळेबाजार बस स्टँड येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. यासाठी पोलिसांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत यापुढे कोणत्याही प्रकाराचा बाजारपेठेत अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ही पोलिसांकडून कारवाई कराण्यात आली होती.