बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये पालकांच्या स्पर्धा..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 10, 2024 14:51 PM
views 162  views

कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी शालेय पालकांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच पालकांच्याही गुणांना वाव दिला पाहिजे तरच संस्था शाळा विद्यार्थी पालक यांचे जिव्हाळ्याचे नाते तयार होते. 

वार्षिक वितरण समारंभाचे औचित्य साधून शाळेमध्ये पालकांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा आणि एक मिनिटात थर्माकोल बॉल गोळा करणे त्याचबरोबर पुरुषांसाठी गोणपाट शर्यत आणि 30 सेकंदात जास्तीत जास्त फुगे फोडणे या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उदघाटन शाळा पालक संघाच्या उपाध्यक्ष  प्रीती करंबेळकर तर उपसचिव अरुण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

संस्थेचे डायरेक्टर श्री. संदीप सावंत सर यांच्या हस्ते पालकांचे स्वागत करण्यात आले. महिला पालकांच्या लिंबू चमचा स्पर्धेमध्ये सौ. अन्वी राणे या प्रथम, सौ. साक्षता पवार द्वितीय व सौ. प्राची चव्हाण तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरल्या. संगीत खुर्ची मध्ये सौ.नेहा देशपांडे, सौ. दिपाली पांगम यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावला. तर थर्माकोल स्पर्धेत सौ. प्राची चव्हाण, सौ. नेहा देशपांडे, सौ. अन्वी राणे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. पुरुष पालकांच्या स्पर्धेमध्ये गोणपाट शर्यतीत सागर जाधव, सुमित सामंत, स्वप्निल राणे यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला तर फुगे फोडण्याच्या शर्यतीत अरुण राणे, सचिन मिठबावकर, स्वप्निल राणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. 

स्पर्धेच्या विजेत्या पालकांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले या स्पर्धेच्यावेळी संस्थेच्या संचालिका सौ .सुलेखा राणे, श्री. रमेश राणे, श्री संदीप सावंत श्री विनायक सापळे शाळेच्या मुख्याध्यापिका, सौ. गीतांजली कुलकर्णी पालक विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन नेहा जामसंडेकर, अश्विनी जाधव, मंजुषा जामसंडेकर,प्रेरणा चिंदरकर,शिल्पा तीवरेकर , अनघा राणे, श्रीपाद बाणे या शिक्षकांनी केले. पालकांच्या स्पर्धेच्या विशेष उपस्थितीबद्दल सौ. कुलकर्णी मॅडम यांनी पालकांचे आभार मानले.