नूतन जिल्हाधिकाऱ्यांची परशुराम उपरकरांनी घेतली भेट

Edited by: विनायक गांवस
Published on: September 18, 2024 13:37 PM
views 392  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी भेट घेतली. श्री उपरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.


यावेळी जिल्ह्यातील महसूल खात्यात चाललेल्या भ्रष्टाचाराबाबत तसेच इतर विषयांवर चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच माजी आमदार उपरकर यांनी योग्य विषयांवर आमचे तुम्हाला नेहमी सहकार्य राहील पण ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाकडून चुकीच्या गोष्टी होतील ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनतेच कामे जर होत नसतील तर त्यावेळी आम्ही उघड बोलू असे श्री उपरकर म्हणाले. तर जिल्हाधिकारी श्री‌ पाटील यांनी  देखील सकारात्मक प्रतिसाद देत चुकीच्या गोष्टींना आम्ही कधी अभय देणार नाही असे आश्वासन दिले. यावेळी आशिष सुभेदार आप्पा मांजरेकर राजेश टंगसाळी नाना सावंत बाळा बहिरे संतोष सावंत राहुल गावकर उपस्थित होते.