
सावंतवाडी : शहरातील लाखे वस्तीला गेले अनेक वर्षे भेडसावणारा घराच्या स्लॅब गळतीचा व ड्रेनेजच्या पाईपलाईनचा गंभीर स्वरूपाचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवादी व त्यांची पत्नी नीलिमा चलवादी यांनी स्वखर्चातून मार्गी लावला. वेळोवेळी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही न सुटणारा प्रश्न चलवादी दाम्पत्याने मार्गी लावल्याने अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटना सिंधुदुर्ग व श्री रासाई युवा कला - क्रीडा मंडळाच्या माध्यमातून लाखे वस्तीतील नागरिकांनी त्यांचा विशेष सत्कार करत ऋण व्यक्त केले.
दरम्यान, सामाजिक भान राखून अत्यंत आदर्श काम केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवादींचे अनेकांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.