
कुडाळ : पणदूर घोडगे मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला या ठिकाणी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन या रस्त्याची पाहणी केली.
सततच्या अतिवृष्टीमुळे कळसुली दिंडवनेवाडी प्रकल्पात पाणीसाठा वाढला असून त्यामुळे पणदूर घोटगे मार्गावरील वाहतुक गेले चार दिवस बंद आहे. हा रस्ता बंद झाल्याने कुपवडे, सोनवडे, जांभवडे, भरणी, सोनवडे या गावांचा कुडाळ तालुक्याशी संपर्क तुटला असून, या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी कळसुली धरण क्षेत्रातील बुडीत रस्त्याची पहाणी केली होती. त्यानंतर निलेश राणे यांच्याकडून रस्ता लवकरात लवकर मोकळा व्हावा यासाठी पाण्याचा विसर्ग वाढविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या मात्र सततच्या अतिवृष्टीमुळे विसर्गाच्या चौपट पाणी पुन्हा धरणक्षेत्रात जमा होत आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या सुचनेनंतर विसर्ग सुरू असून पावसाचे प्रमाण कमी झाल्यास पणदूर घोटगे रस्ता वाहतुकीस मोकळा होईल.