मुख्यमंत्र्यांनी पंढरीच्या विठूरायाची केली शासकीय पूजा !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 17, 2024 05:51 AM
views 194  views

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय पूजा केली. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील होते. त्यानंतर त्यांनी सोशल मिडियावर हे फोटो शेअर केलेत. 


पूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी पोस्ट !

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा करण्याचे सौभाग्य मिळाले. यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. त्यांच्यासोबत पूजा करण्याचे सौभाग्य मिळणे हा माझ्यासाठी बहुमान ठरला. 


यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढेच मागणे याप्रसंगी विठुरायाच्या चरणी मागितले. तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे असे मागणे मागितले.  

 

यावेळी माझे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ.लता, मुलगा  डॉ.श्रीकांत, सून वृषाली, नातू रुद्रांश तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर तसेच शिंदे कुटूंबातील सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते.