कोल्हापूरात पुरपरिस्थिती ; पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 24, 2023 12:49 PM
views 91  views

कोल्हापूर : कोल्हापूरात पंचगंगा नदीचे पाणी वाढू लागले आहे.कोल्हापुरला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. ८२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज पहाटे ३ वाजता पाण्याने ३९ फूट  इशारा पातळी गाठली आहे. धोका पातळीपासून फक्त ४ फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास कोल्हापूरला पुराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे.