किंजवडेत मातीपासून पणती बनवणे कार्यशाळा..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 09, 2023 19:50 PM
views 143  views

देवगड : सण दिवाळीचा, आनंद स्वनिर्मितीचा या भूमिकेतून वायू -भूमी तत्वानुसार हरित सणाना प्रोत्साहन देण्यासाठी 'मातीपासून पणती बनवणे'या कार्यशाळेचे ग्रामपंचायत किंजवडे येथे आयोजन करण्यात आले होते. या शाळेमधून तयार केलेल्या मातीच्या पणत्या गावातील सर्व कुटुंबांना वाटप करण्यात येणार आहेत.

कणकवली येथील  परशुराम सांगवे यांनी सर्व विद्यार्थी, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका यांना मातीपासून पणती बनवणे संदर्भात प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी स्वनिर्मितीतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी आपल्या मनोगतातून या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक केले.

या कार्यकमासाठी सरपंच  संतोष किंजवडेकर, उपसरपंच  विनय पाडावे,किरण टेंबुलकर, गणेश जोईल,सर्व ग्रामपंचायत सद्स्य,  ग्रामसेवक शिवराज राठोड, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक शाळांचे शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

किंजवडे ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेक उपक्रम राबवून एक आपला वेगळेपण निर्माण केला आहे . यापूर्वी विवाह नोंदणी गावांमध्ये दाखला मिळण्यासाठी दोन वृक्ष लागवड केलेल्या चे फोटो बंधनकारक केले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात किंजवडे ग्रामपंचायतचे कौतुक केले जात आहे व त्यांचा आदर्श घेऊन अनेक ग्रामपंचायतीने विवाह नोंदणी दाखला मिळण्यासाठी नवीन वृक्ष लागवड केल्याचा फोटो बंधनकारक केला आहे.तसेच किंजवडे ग्रामपंचायतने पुस्तकांचे गाव म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी येथील नव्या पिढीला वाचन संस्कृती निर्माण व्हावी याही दृष्टिकोनातून त्यांनी गावांमधील अनेक पुस्तके देणगी स्वरूपात गोळा करून वाचनासाठी आज सर्वांना उपलब्ध करून दिली आहेत व अनेक पुस्तके गोळा करणे चे कामही चालू आहे असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम किंजवडे ग्रामपंचायत राबित असल्यामुळे आज हि ग्रामपंचायत सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करत आहे यामध्ये सरपंच संतोष किंजवडेकर ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळत आहेत व ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी किंजवडे ग्रामपंचायतचा काही महिन्यापूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीचे सचिव या नात्याने त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गावचा विकास साधून किंजवडे गाव विकासाच्या मुख्य प्रवाहात व शासनाच्या अनेक योजना राबवून प्रकाश झोतात आणण्याचे काम करत आहे.