पाळणेकोंड धरणाचे दरवाजे खुले !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 09, 2024 11:04 AM
views 143  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेचे पाळणे कोंड धरण पुर्ण क्षमतेने भरले असून सोमवारी पहिल्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मंगळवारी या धरणाचे सहाही हायड्रोलिक दरवाजे उघडण्यात आले. सर्व दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.




मंगळवारी विनायक चतुर्थी असल्याने मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी पाळणेकोंड मंदिर येथील गणरायाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर जलदेवतेची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी पाणी पुरवठा अभियंता भाऊ भिसे, श्री पिळणकर आदी उपस्थित होते.दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण तुडुंब भरले असून शहरासाठी ही आनंददायी बातमी असल्याचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले.‌