पाडलोस गाव व्हॅाट्सॲप ग्रुप भविष्यात आदर्श ठरेल : शैलेश परब | पाडलोस येथे भजन स्पर्धेचे उद्धाटन

Edited by: विनायक गावस
Published on: August 22, 2023 19:19 PM
views 150  views

सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गावरील समस्या मांडणारे गीत भजनाच्या माध्यमातून समोर आले आहे. भजनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या शासनापर्यत पोहोचविल्या जातात. व्हॅाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून अशा प्रकारची स्पर्धा जिल्हयात आजपर्यंत कुठेही झाली नाही निवडून दिलेल्या रागातून गायन करणे खूप कठीण असते आणि हे पाऊल या ग्रुपने उचलले आहे.त्यामुळे पाडलोस व्हॅाट्सॲप ग्रुप भविष्यात आदर्श ठरेल असे प्रतिपादन मुंबईचे माजी नगरसेवक शैलेश परब यांनी केले. 

पाडलोस गाव व्हॅाट्सॲप ग्रुप ‘ राग आमचे भजन तुमचे ‘ या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्धाटन रवळनाथ मंदिर येथे माजी नगरसेवक शैलेश परब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर,पोलिस पाटील रश्मी माधव सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर,सोसायटी चेअरमन तुकाराम शेटकर,व्हॅाट्सॲप ग्रुपचे अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर,उपाध्यक्ष यशवंत सातार्डेकर,ग्रामपंचायत सदस्य प्रतिक्षा गावडे,रोशनी गावडे,पत्रकार विश्वनाथ नाईक मंगल कामत प्रविण परब, नीलेश परब आदी उपस्थित होते.

ग्रुपचे अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर यांनी श्री परब यांना ग्रुपच्या कार्याविषयी माहिती दिली.यावेळी पाडलोस गाव व्हॅाट्सॲप ग्रुप दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. क्रिडा,शैक्षणिक, सामाजिक,आरोग्य अशा अनेक क्षेत्रात व्हॅाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून कार्य केले जात आहे केवळ चर्चा करण्यासाठी नव्हे तर या व्हॅाट्सॲप ग्रुपमार्फत लोकभिमुख कार्य घडत असल्याचे उद्धार शैलेश परब यांनी काढले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत व उपसरपंच राजू शेटकर यांनी केले सचिव अमेय गावडे सहसचिव बापू गावडे खजिनदार राजाराम गावडे सहखजिनदार रोहित गावडे तसेच सर्व मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.आभार अजित गावडे यांनी मानले.