ओवी वाक्कर यांनी पटकावली मानाची पैठणी !

ग्रामपंचायत आंबेरी- प्राथमिक शाळेच्यावतीने महिला दिनी विविध कार्यक्रम
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 13, 2024 13:23 PM
views 293  views

मालवण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत आंबेरी आणि पूर्ण प्राथमिक शाळा आंबेरी नंबर १ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य मार्गदर्शन आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 


सरपंच मनोज डिचोलकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी उपसरपंच रविंद्र परब, सर्व ग्रा. सदस्य ग्रामसेविका सौ. कदम, मुख्याध्यापक धानजी चव्हाण, सौ.शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य सौ. श्रद्धा केळुसकर, भरत परब, सौ.कल्याणी परब, माजी सरपंच सौ. साक्षी कांबळी, कदम सर, सौ.गीरकर, यासह अन्य उपस्थित होते. 


या कार्यक्रमांना गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आरोग्य शिबिरा बरोबर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खेळ पैठणीचा, फनी गेम्स, मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच लकी ड्रॉ चे आयोजन केले होते. यामध्ये मोबाईल रवींद्र परब, मिक्सर कमलेश वाक्कर, स्मार्ट वॉच गणेश डिचोलकर यांनी पुरस्कृत केला होता. तर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सरपंच मनोज डिचोलकर यांनी पुरस्कृत केला होता. या सर्व कार्यक्रमांना गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लकी ड्रॉ मध्ये मोबाईल - सौ मेघा गोसावी, मिक्सर सौ. आंबेरकर, स्मार्ट वॉच सौ.साक्षी कांबळी यांना मिळाला. तर मानाची पैठणी सौ ओवी वाक्कर यांनी पटकावली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.