
कणकवली : तालुक्यातील कोतवाल समीर राणे यांना उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते देण्यात आला. कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाल समीर राणे यांनी 1 ऑगस्ट 2008 रोजी कोतवाल पदावर रुजू झाल्यानंतर शैपै, कुरगवणे, चिचवली, बिर्ले या गावात प्रामाणिकपणे काम करत गावात महसुलाची वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले. आणि गावातील संबंधित लोकांना माहिती देणे नोटीस बजावण्याचे काम पार पाडले.
तसेच नैसर्गिक आपत्ती संबंधीची माहिती त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचवून गावातील समस्यांचे निवारण केले. ई पीक पाणी साठी देखील जनजागृती करून शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद ई पीक पाणी करण्यासाठी मदत केली. याची दखल घेऊनच एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त कोतवाल समीर राणे यांना उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार देण्यात आला.