जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांच्या कार्याचा गौरव !

उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार जाहीर
Edited by: ब्युरो
Published on: January 23, 2024 07:34 AM
views 379  views

सिंधुदुर्ग : उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार २०२४ राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये कोकण विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

राज्यामध्ये सन 2023-24 या वर्षभराच्या कालावधीमध्ये निवडणूक विषया संदर्भात केलेल्या उल्लेखनीय व नाविन्यपुर्ण कामगिरींच्या आधारे राज्यातील  अधिका-यांची राष्ट्रीय मतदार दिना निमित्त पारितोषिक व सत्कारासाठी राज्यस्तरावरुन निवड करण्यात आलेली आहे.