
कुडाळ : हिंदुत्व, विकास आणि जनसेवेचा ध्यास शिवसेनेच्या प्रत्येक शाखेतून नव्या जोमाने पुढे जात राहील. अखंड जनसेवेचा संकल्प घेऊन शिवसेनेचा गावा गावात विस्तार करणे हेच आमचं स्वप्न असल्याचे आमदार निलेश राणे यांनी पणदूर तिठा येथे शिवसेना शाखेच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले.
गेल्या वर्षभरात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेना एक नंबरचा पक्ष झाला आहे. कुडाळ तालुक्यातील पहिल्याच शिवसेना शाखेचे पणदूर तिठा येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी अखंड जनसेवेचा व्रत हाच शिवसेनेचा विस्तार असल्याचे प्रतिपादन निलेश राणे यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की सर्वसामान्य जनतेची अडलेली कामे आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या शाखेच्या माध्यमातून संकल्प हाती घेण्याचे आव्हान त्यांनी केले. त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार असून आपण सर्वांनी जोरदार तयारी करावी असे आवाहन त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना केले याप्रसंगी माजी जि.प. अध्यक्ष श्री. संजय पडते, जिल्हा सचिव दादा साईल, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, ओंकार तेली, तालुकाप्रमुख दीपक नारकर, विनायक राणे, महिला तालुकाप्रमुख सौ. वैशाली पावसकर, युवासेना तालुकाप्रमुख अनिकेत तेंडोलकर, सागर वालावलकर, शहर प्रमुख अभि गावडे, पावशी महिला विभाग प्रमुख मृणाल परब, पावशी उपविभाग प्रमुख गजानन कुलकर्णी, राजन जाधव, जयदीप तुळसकर, विनायक राणे, नित्यानंद कांदळगावकर, राजन भगत, विठ्ठल तेली, गोपाळ पालव, देवेंद्र नाईक, चंदन कांबळी, गोट्या शिरोडकर, डॉ साईल, शंकर परब, गोपाळ पालव, प्रदीप जावकर, कुबल गुरुजी, प्रदीप जाधव, शाखा प्रमुख बबन निर्गुण, सुनील गायकवाड, उपशाखा प्रमुख किशोर पणदूरकर, युवासेना उपशाखा प्रमुख सचिन साईल, युवा मोर्चा सोशल मिडिया हरेश साईल बूथ प्रमुख, विनायक साईल, मोहन मयेकर, विजय मयेकर, राजा निर्गुण, प्रदीप जाधव, महिला सेना शाखा प्रमुख अपर्ण साईल, शिवदूत गणेश साईल, प्रसाद साईल, नितेश साईल, तन्मय साईल, महेंद्र साईल, महिला शिवदूत उन्नती साईल, राखी गोसावी, भाग्यश्री साईल, अंकिता राऊळ तसेच सर्व शिवसेना आजी-माजी पदाधिकारी, महिला व युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










