अन्यथा वेगळा प्रचार करू | NCP च्या रिद्धी परब यांचा इशारा

Edited by:
Published on: February 12, 2024 14:58 PM
views 288  views

सावंतवाडी : सावंतवाडी वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यास राज्यातील महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना डावलून राज्याचे  शिक्षणमंत्री तसेच सावंतवाडी वेंगुर्ला विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

तरी यापुढे  सावंतवाडी तालुक्यात अश्याप्रकारे वागणूक मिळाल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी तालुक्यात वेगळा विचार केला जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा रिद्धी परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.