सासोली भरपाल मार्गावर अज्ञाताने लावली आग

शेत मांगरासह पाईप आगीत भस्मसाद
Edited by:
Published on: February 17, 2025 17:08 PM
views 110  views

दोडामार्ग : सासोली भरपाल मार्गावर सासोली येथे रविवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत शेत मांगरासहित तिलारी जलसंपदा विभागाचे अंडरग्राउंड पाण्यासाठी वापरणारे पाईप आगीत भस्म साद होऊन शेतकरी व संबंधित ठेकेदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्त व दोडामार्ग नगरपंचायत अग्निशमन बंब यांनी आग आटोक्यात आणली. मात्र सदरची आग कोणी अज्ञान्त व्यक्तीने लावली असावी अशी चर्चा केली जातं आहे. 

रविवारी दुपारी 1.00 वाजण्याच्या सुमारास सासोली भरपाल कुडासे मार्गावर मोकळ्या जागेत आग लागली दुपारची वेळ असल्याने आगीने मोठे रुद्र रूप धारण केले. आकाशात आगीचे मोठे धूर दिसू लागले. हे येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्या घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत आज भिजवण्यास प्रयत्न सुरू केले आगीच्या भक्षस्थानी असलेले तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे पाण्याचे पाईप ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून बाजूला काढले त्यातील काही पाईप आगीत जळून  खाक झाले. दुपारची वेळ आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या वाऱ्यामुळे आग हळूहळू सर्वत्र पसरू लागली अर्जुन कोंडूस्कर यांच्या आंबा बागेत आग गेल्याने त्यांची आंबा बाग तसेच शेतमांगर जळून खाक झाला. त्यांची लाल्हो रुपयाचे नुकसान झाले. 

दुपारची वेळ सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रुद्र अवतार धारण केलेल्या आगीने सर्वत्र हा कार माजवला सासोली येथे जमिनीच्या आत मधून शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येणारे पाण्याचे पाईप आगीच्या भक्षस्थानी होते. अर्धे पाईप जळून खाक झाले. कोणाचेही असो असे म्हणून जीवाची पर्वा न करता सासोली,  वाघमळा येथील ग्रामस्थांनी हाताला चटके बसेपर्यंत पाण्याचे पाईप बाजूला केले.