...अन्यथा जिल्हा परिषदला टाळे ठोकू : योगेश धुरी

Edited by: भरत केसरकर
Published on: August 24, 2023 15:00 PM
views 482  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती परीक्षा केंद्र जिल्ह्यात द्या अन्यथा जिल्हापरिषदला टाळे ठोकू-युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी // तलाठी परिक्षे दरम्यान जिल्ह्यातील तरूणांची परजिल्हात झाली मोठी गैरसोय // जिल्हा परिषद भरतीत जास्तीत जास्त जिल्ह्यातील तरुण बेरोजगार लागले पाहिजेत // सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती परीक्षा केंद्र जिल्ह्यात द्या अन्यथा जिल्हापरिषद ला टाळे ठोकू // युवासेनेने दिला इशारा // तलाठी परीक्षेत जिल्ह्यातील तरूणांची मोठी गैरसोय // जिल्ह्यात 3 मंत्री // पण एकानेही साधा आढावा पण घेतला नाही की आपले जिल्ह्यातील बेरोजगार या भरतीसाठी जात आहेत तर त्यांची गैरसोय होऊ नये // यासाठी कुठलही नियोजन केले नाही // त्यात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर हे केंद्र जवळपास सर्वांनाच मिळालेलं // ह्या दीपक केसरकरांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही // त्यांना फक्त मंत्रिपद महत्वाचं बाकी सगळे गेले भाड मध्ये अशी त्यांची केविलवाणी अवस्था // जिल्ह्याचे पालकमंत्री हे गायब // आता त्यांना शोधण्यासाठी केंद्रातून पथक मागवावे लागेल // अशी झालीय अवस्था // केंद्रीय मंत्री राणेंनी जिल्ह्यातील डीएड वाल्याना शब्द दिलाय काही झालं तरी जिल्ह्यातील डीएड बेरोजगाराना शिक्षण सेवेत घेणार // परंतु त्यांच्या ह्या शब्दाला केसरकरांनी केराची टोपली दाखवली // माझा जिल्ह्यातील तरुण तरुणी मतदारांना एवढंच प्रश्न आहे की जे सरकार रोजगार देऊ शकत नाही त्याना मतदान का करायचं? // तुमच्या जीवावर निवडून यायच आणि मग साधी दखल पण घ्यायची नाही // आमदार वैभव नाईक यांनी मोफत तलाठी मार्गदर्शन शिबिर घेतलं// हे खरं समाजकार्य // ही समाजाप्रती असलेली बांधिलकी // ह्या असल्या सरकार आणि असल्या नेत्यांना मतदान करून बेरोजगारी वाढवू नका // उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला साथ देण्याचे आवाहन //